मधुमेह

 

मधुमेह

 

मधुमेह म्हणजे काय

 

ज्यावेळी रक्तातील साखरेची पातळी एका विशिष्ट प्रमणापुढे जाते तेव्हा मधुमेहाचे निदान होते .

कोणत्याही वेळेतली साखर ( उपाशीपोटी , जेवणांनंतर दोन तासांनी अथवा इतर कोणत्याही वेळेस )

२०० mg /dl पेक्षा जास्त होते तेव्हा त्याला नवीन मार्गदर्शक तत्वानुसार मधुमेह म्हटले जाते .

मधुमेहाची लक्षणे

 

वजन वाढणे अथवा कमी होणे , जास्त तहान लागणे , जास्तवेळा लघवी होणे , त्वचेला खाज अथवा

पुरळ उठणे , जखम भरून येण्यास विलंब होणे अथवा जखम भरून न येणे ही मधुमेहाची सर्वसामान्य

लक्षणे आहेत . अर्थात या सर्व लक्षणांशिवायदेखील मधुमेहाची शक्यता नाकारता येत नाही

 

मधुमेहाच्या चाचण्या  आणि त्या कशा कराव्या

 

मधुमेह निदानासाठी उपाशीपोटीची रक्तशर्करा , जेवणानंतर ११/२ ते २ तासानंतरची पातळी

आणि अतिशय उपयुक्त अशी ग्लयकोसिलटेड हिमोग्लोबिन -HBA१C नावाची चाचणी जी गेल्या 2 ते 3 महिन्यातील साखरेची avarage पातळी दाखवते

 

याशिवाय इन्सुलिन , सी peptide या चाचण्या आवश्यकतेनुसार केल्या जातात

 

मधुमेह कसा होतो

 

आपल्या शरीरात पोटामध्ये pancreas ( स्वादुपिंड) नावाची

ग्रंथी असते ज्यामध्ये इन्सुलिन निर्माण करणारे बीटा पेशी असतात इन्सुलिनचे कार्य रक्तशर्करा नियंत्रित ठेवणे असते.त्यामुळे जेव्हा इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होते, अथवा शरीर त्याच्या कार्यास प्रतिरोध करते तेव्हा संतुलन बिघडून मधुमेह होतो

 

मधुमेहाचे प्रकार

 

मधूमेह type 1 , जो इन्सुलिनच्या कमतरतेने होतो आणि

त्याला इन्सुलिन dependant मधुमेह असे म्हणतात

 

मधुमेह type 2, जो इन्सुलिनच्या प्रतिरोधाने होतो त्याला

नॉन इन्सुलिन dependant मधुमेह म्हटले जाते

 

जस्टेशनल मधुमेह, गर्भार अवस्थेत उत्पन्न होणारा मधुमेह

 

याशिवाय स्ट्रेस , बैठे काम , व्यायामाचा अभाव यानेदेखील मधुमेह उत्पन्न होतो

मधुमेहासाठी कशी चाचणी करावी ?

 

साधारणतः मधुमेहासाठी , उपाशीपोटीची रक्तशर्करा , जेवणं केल्यावर ( भोजनपश्चात ) रक्तशर्करा  या तपासण्या केल्या जातात .

 

रात्री जेवण केल्यावर सकाळी उपाशीपोटी ( १०-१२ तासांचा उपवास ज्यामध्ये पाणी घेऊ शकता ) दिलेला

नमुना आणि जेवण झाल्यावर दीड  ते दोन तासापर्यंतच्या कालावधीत घेतलेला नमुना  घेतला जातो .

 

याशिवाय HBa१C  नावाची अतिशय महत्वपूर्ण चाचणी केली जाते . सदर चाचणीसाठी रुग्ण कधीही

रक्त देऊ शकतो आणि गेल्या ३ महिन्यातील साखरेचे avarage प्रमाण त्यावरून लक्षात येते .

 

याव्यतिरिक्त इन्सुलिन आणि सी पेप्टाईड नावाच्या चाचण्या आवश्यकतेनुसार सांगितल्या जाऊ

शकतात .

मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंती

 

मधुमेहाची नीट काळजी घेतली घेतली नाही अथवा औषधोपचार ,व्यायाम याकडे दुर्लक्ष केले

तर दीर्घ कालावधीमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात . किडनी ,हृदय ,लिव्हर या महत्वपूर्ण

अवयवांवरती तसेच मज्जासंस्थेमध्ये दोष उद्भवून बरे न होण्यासारखे रोग जडू शकतात .

 

मधुमेहासाठी सर्वसाधारण घ्यावयाच्या दक्षता

 

सर्वसाधारणपणे मधुमेही व्यक्तींनी आहार आणि जीवनशैली याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते .

यात वेळच्यावेळी जेवणे करणे ,व्यायाम करणे , डॉक्टरांची औषधे आणि सूचना पाळून

नियमितपणे तपासण्या करणे .

 

साधारणतः ,

नियमित चालणे ,पोहोणे पैकी व्यायाम

जेवणातील नियमितपणा

गोड पदार्थ ,तळलेले पदार्थ ,गॉड फळे वर्ज्य करणे

आहारात प्रथिनयुक्त पदार्थ ,हिरव्या भाजा सलाड यांचा समावेश करणे ..

 

     

 

    ३० अथवा त्यापुढे मधुमेह असो अथवा नसो त्याला आधीच ओळखण्यासाठी वर्षातून

एकदा तरी सर्व योग्य तपासण्या करणे.

 

Ranges for Blood Sugar

 

Fasting                          60-110

Post Prandial              100-150

Random                      upto 150

 

Urine Micral Test

 

Negative                       Less than 20

Positive                         More than 20

 

Hba1c Test

 

Normal                          4 to 5.6

Prediabetic                   5.7 to 6.4

Diabetic                        > 6.5

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>